ओमिक्रॉनच्या सौम्य संसर्गामुळं या अवयवांचं होतंय नुकसान, नवीन अभ्यासात करण्यात आला दावा

पुणे, 11 जानेवारी 2022: ओमिक्रॉन हे हलक्या संसर्गाचे प्रकार म्हणून जगभर दुर्लक्षित केले जात आहे. याबाबत जर्मन तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असं सुचवण्यात आलं आहे की, रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नसली तरीही कोरोना विषाणूचा संसर्ग त्याचा प्रभाव सोडतो. हे महत्त्वाचं आहे कारण जगभरात झपाट्यानं पसरत असलेला ओमिक्रॉन लक्षणं किंवा सौम्य संसर्गाच्या प्रकरणांशिवाय संक्रमित होत आहे.

अभ्यासानुसार, रोगाचा सौम्य संसर्ग देखील शरीराच्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकतो. यासाठी, SARS-CoV-2 संसर्गाची सौम्य लक्षणं असलेल्या 45 ते 74 वर्षे वयोगटातील एकूण 443 लोकांची विस्तृत तपासणी करण्यात आली. अभ्यासात समाविष्ट असलेल्या संक्रमित लोकांमध्ये सौम्य किंवा कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. त्याचा परिणाम असे दर्शवितो की ज्यांना संसर्ग झाला नाही अशा लोकांच्या तुलनेत या संक्रमितांमध्ये मीडियम टर्म अवयवांचं नुकसान दिसून आलं.

“फुफ्फुसाच्या कार्य चाचण्यांमध्ये फुफ्फुसाचे प्रमाण आणि वायुमार्गाच्या समस्यांमध्ये तीन टक्के घट दिसून आली,” असौ अभ्यासाच्या संशोधकांनी एका निवेदनात म्हटलं आहे. याव्यतिरिक्त, हृदयाच्या पंपिंग पॉवरमध्ये सरासरी 1 ते 2 टक्के घट झाली. तर रक्तातील प्रथिनांची पातळी 41 टक्क्यांनी वाढली, जी हृदयावरील ताणाबद्दल सांगते.

संशोधकांना ‘लेग व्हेन थ्रोम्बोसिस’ (पायांच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या) दोन ते तीन पट अधिक वेळा आणि किडनीच्या कार्यामध्ये सुमारे दोन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आलं. तथापि, रुग्णांच्या मेंदूच्या कार्यावर कोणताही वाईट परिणाम आढळला नाही.

सायंटिफिक स्टडी सेंटरचे संचालक राफेल ट्वेरेनबोल्ड म्हणाले, ‘ही माहिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. विशेषतः ओमिक्रॉनच्या बाबतीत, जे सौम्य लक्षणांशी संबंधित असल्याचं दिसून येते. यूकेच्या हार्ट अँड व्हॅस्कुलर सेंटरचे वैद्यकीय संचालक स्टीफन ब्लँकेनबर्ग म्हणाले, ‘अभ्यासाचे परिणाम प्रारंभिक टप्प्यावर संभाव्य धोके समजून घेण्यास मदत करतात जेणेकरून रुग्णांच्या उपचारात योग्य पावलं उचलता येतील.’

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचे पूर्वीचे प्रकार लोअर रेस्पीरेटरी सिस्टिममध्ये त्यांची संख्या वाढवत होते, त्यामुळं व्हायरसचा मानवी फुफ्फुसांवर जास्त परिणाम झाला होता. परंतु नवीन ओमिक्रॉन प्रकार वरच्या श्वसन प्रणालीमध्ये प्रतिकृती बनवते, ज्यामुळं फुफ्फुसांना कमी नुकसान होऊ शकते. श्वास घेण्यास त्रास होणं आणि चव, वास ओळखण्याची क्षमता कमी होणं यासारखी लक्षणंही दिसत नाहीत. तथापि, लक्षणांची अनुपस्थिती व्हायरसच्या प्रसारास गती देऊ शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा