दमवनारा ‘दमा’ त्यावर करूया ‘मात’

धावपळ म्हणली कि, दम लागणारच! पण दमा असणाऱ्यांना याचा सखोल अर्थ आणि वेदना कळू शकते. दम्याच्या रुग्णाला दम्याचा कधी, केव्हा, कुठे, कसा, किती त्रास होईल हे सांगणे, काढणे कठीण असल्याने तात्पुरत्या उपायांचे सामान बाळगावे लागते. काही पथ्य आणि मार्ग अवलंबल्याने दमा बारा होऊ शकतो…
▪ श्वासाच्या काही कफपूर्ण अवस्थेत गोमुत्राच्या वाफेचा उत्तम उपयोग होतो. लवंग, जायफळ, काळी मिरी, सुंठ, खडीसाखर हे सम प्रमाणात एकत्र करून मधातून घ्यावे. सेवन करून गरम पाणी प्यावे चांगलाच फायदा होतो.
▪ आवळा, सुंठ, पिंपळी, हिरडा, काळी मिरी आणि बेहडा यांचे एकत्रित चूर्ण करून मधाबरोबर वारंवार चाटल्यास श्वास व खोकल्याला उत्तम फायदा होतो.दम्याचा त्रास बऱ्याचदा अजीर्णाने, पोट बिघडल्याने होताना दिसून येतो. म्हणूनच अजीर्ण करणारे, पोट जड करणारे पदार्थ घेऊ नये.
▪ तुमची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या वेळा, आणि दैनंदिन कामे याचे व्यवस्थित नियोजन तुम्हाला दम्यापासून मुक्ती देऊ शकते. मद्यपान, धूम्रपान या गोष्टी सामान्यतः प्रत्येकच व्यक्तीने टाळाव्यात. मात्र दम्याच्या व्यक्तीने तर या व्यसनांपासून दूरच राहावे!
▪ अचानक दम्याचा अटॅक आल्यास गरम पाण्यात तुळस, ओवा एकत्र करून त्याची वाफ नाकाद्वारे घेतल्यास इतर वाफेपेक्षा चांगलाच फायदा होतो. याच पाण्याचा शेक छातीला, पाठीला दिल्यास तसेच श्वासाच्या रुग्णाचे दोन्ही पाय गरम पाण्यात बुडवून ठेवल्यास रुग्णाला बरे वाटते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा