गोल पोस्ट क्रीडा दंगल गर्ल ‘बबिता फोगट’ विवाहबद्ध

दंगल गर्ल ‘बबिता फोगट’ विवाहबद्ध

नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट ही भारत केसरी विजेता पैलवान विवेक सुहागसोबत रविवारी (दि.१) रोजी विवाहबद्ध झाली. या लग्नात २१ वऱ्हाडी उपस्थित होते.
या लग्नात प्रथेप्रमाणे ७ फेरे घेत एक अधिकचा आठवा फेरादेखील घेण्यात आला. जो बेटी बचाओ-बेटी पढाओचा संदेश देणारा होता. बबिता आणि विवेक भेट दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना आपल्या नात्याविषयी कल्पना दिली. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी जून महिन्यात त्यांचा विवाह निश्चित केला.
हरयाणातील बलाली या गावी बबिता आणि विवेक यांचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह पारंपरिक पद्धतीने आणि अतिशय साधेपणाने पार पडला.

error: Content is protected !!
Exit mobile version