टोकियोमध्ये अंधार, 20 लाख घरांमध्ये वीज खंडित, 11 वर्षे जुन्या सुनामीची आठवण, लोक भयभीत

टोकियो, 17 मार्च 2022: जपानमध्ये बुधवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.3 इतकी मोजली गेली. या भूकंपाचे धक्के नेहमीपेक्षा जास्त आहेत. बुधवारी जपानमध्ये एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप रात्री 8:06 च्या सुमारास झाला, त्याचा केंद्रबिंदू जपानची राजधानी टोकियोपासून 297 किमी उत्तर-पश्चिम दिशेला होता. जोरदार भूकंपानंतर जपानमध्ये सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

जपानच्या हवामान संस्थेने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रापासून 60 किलोमीटर खाली होता. हाच प्रदेश आहे ज्याने आतापर्यंत विनाशकारी भूकंप आणि नऊ तीव्रतेच्या सुनामीचा सामना केला आहे. मात्र बुधवारी जाणवलेल्या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.

20 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित

त्याचवेळी भूकंपाच्या धक्क्यांनंतर जपानची राजधानी टोकियोमध्ये अंधार पसरला आहे. एएफपीने टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या हवाल्याने म्हटले आहे की, जपानमधील भूकंपानंतर सुमारे 20 लाख घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.

सोशल मीडियावर लोकांनी शेअर केले व्हिडिओ

जपानमधील भूकंपाचा व्हिडिओ लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

22 जानेवारीलाही असे हादरे जाणवले होते

यापूर्वी 22 जानेवारी रोजी जपानच्या नैऋत्य आणि पश्चिम भागात झालेल्या भीषण भूकंपामुळे 10 हून अधिक लोक जखमी झाले होते. शनिवारी दुपारी 1.08 वाजता भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेच्या म्हणण्यानुसार, क्यूशू बेटाजवळ 1 वाजून 2 मिनिटांनी भूकंप झाला, ज्याचा केंद्रबिंदू 40 किलोमीटर (24.8 मैल) खोलीवर होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा