पुण्यातील जम्बो रूग्णालयातील रूग्णांच्या तबियेतीच्या माहिती साठी आता डॅशबोर्डची व्यवस्था

पुणे, १६ सप्टेंबर २०२० : पुण्यातल्या जम्बो रुग्णालयातील रुग्णांच्या तब्येतीची माहिती आता अधिकारी आणि डॉक्टरांना तात्काळ मिळू शकणार आहे. त्यासाठी पालिकेने डॅशबोर्ड यंत्रणा कार्यान्वित केली असून रुग्णांच्या खाटेच्या क्रमांकानुसार संबंधित रुग्णाची सद्यस्थिती आता डॉक्टरांना लगेच समजू शकणार आहे.

खाटेला जोडलेल्या व्हेंटीलेटर आणि अन्य उपकरणांवरील माहिती थेट या यंत्रणेद्वारे डॉक्टरांना समजू शकणार आहे. सोमवारपासून या डॅशबोर्ड सुविधेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली. जो रुग्ण अत्यवस्थ असेल त्यांच्यापुढे लाल रंगाची पट्टी येते. त्यामुळे कामाच्या वेगवेगळ्या वेळेत येणाऱ्या सर्वच डॉक्टरांना सर्वात आधी या अत्यवस्थ रुग्णांची तपासणी करणं शक्य होणार आहे.

पालिकेने सुरु केलेला हा डॅशबोर्ड डॉक्टर आणि अधिका-यांसाठी आहे.
दरम्यान जम्बो रुग्णालयातील परिस्थिती हळूहळू सुधारत असून वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने रुग्णांची संख्याही वाढवण्यात आली आहे. या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी रुग्णालयात सर्वत्र सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा