शिरूर, दि.२८ मे ,२०२०: काठापुरचे माजी सरपंच भाऊसाहेब औटी यांचे चुलते शंकर सखाराम औटी ( वय ८५ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.अतिशय कष्ठामधून त्यांनी प्रगतशिल शेती केली. सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्याच्या दशक्रिया विधीचा खर्च टाळून त्या कुटुबांने शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या माध्यमामधुन कोरोनाच्या संकटात अडचणीत आलेल्या गरीब कुंटुबाच्या मदतीसाठी २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्याकडे धनादेश देण्यात आला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव (आण्णा) जोरी, आदर्श माजी सरपंच भाऊसाहेब औटी, सरपंच बिपीन थिटे, बाबांचे चिरंजीव पोपट व आनंदा शंकर औटी, कांताराम दाते, गोरक्षनाथ ईरोळे उपस्थित होते .
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे यांनी औटी कुटुंबाच्या कार्याचे कौतुक केले. त्यांचा आदर्श इतरांनी घेऊन लग्न व इतर विधीसाठी होणारा खर्च टाळावा व कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरीब जनतेला मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर











































