दत्तात्रेय भरणे याना मंत्रीपद मिळणार

इंदापूर (प्रतिनिधी): राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या, सोमवारी उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सरकारमध्ये सामिल असलेल्या तिन्ही पक्षातील राज्यातील विविध भागातील नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्यातील दत्तात्रेय भरणे यांचे ही नाव घेण्यात येत आहे. इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक अटीतटीची झाली होती. चुरशीच्या निवडणुकीमध्ये आमदार दत्तात्रेय भरणे यांचा ३२०९ मतांनी विजय झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर चे आमदार दत्तात्रेय भरणे याना मंत्रीपद मिळणार असल्याने इंदापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. तर शपथविधी सोहळ्यासाठी इंदापुरातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
सोमवारी होत असलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळ विस्तारत भरणे याना संधी मिळत आहे. यापूर्वी भरणे याना मंत्रीपद मिळावे यासाठी पक्षश्रेष्ठीकडे मागणी करण्यात आली होती.
भरणे यांनी २०१४आणि २०१९ मध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा