नारायणपुर येथील दत्त जयंती यावर्षी अगदी साधेपणाने होणार साजरी

पुरंदर, १२ डिसेंबर २०२०: सध्या सगळीकडंच कोरोना सदृश्य परिस्थिती असल्या कारणानं नारायणपुर येथील दत्त जयंती सोहळा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असुन मंदिरातील होम हवन, पुजा, जन्म सोहळे, मिरवणूक असे कार्यक्रम फक्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत साजरे होतील, असं तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी स्पष्ट केलं आहे.

श्री क्षेत्र नारायणपूर ( ता. पुरंदर ) येथे सालाबाद प्रमाणं याहीवर्षी दत्त जयंती सोहळा दिनांक २७, २८ व २९ डिसेंबर २०२० या कालावधीत होत आहे. यासाठी सद्गुरू नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अमर माने, नारायणपुरचे प्रशासक सतीश कुंभार, ग्रामसेवक रोहित अभंग, देवस्थानचे व्यस्थापक भरतनाना क्षिरसागर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, पोलीस पाटील मारुती बोरकर, दादासाहेब भुजबळ, भिमसेन बोरकर सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

आमदार संजय जगताप यांनी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना करीत प्रत्येक खात्याला त्यांच्या त्यांच्या जबाबदारी पारपडण्याच्या सूचना दिल्या . २७, २८ व २९ डिसेंबर २०२० या कालावधीत सोहळा होत असुन सासवड-नारायणपूर, नारायणपूर-कापुरव्हळ, कोडीत-नारायणपूर हे मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा