दत्तजयंतीनिमित्त औंध मध्ये विविध कार्यक्रम

औंध : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. याच पर्शभुमिवर औंध येथील पन्नास वर्षांपेक्षा ही जुन्या असलेल्या पायठा चौकातील श्री सुय॔मुखी गुरुदेवदत्त मंदिरात दरवर्षी दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात येतो. यावर्षीही दत्तजयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे दि. ०७/१२/२०१९ ते ११/१२/२०१९ पय॔ंत आयोजन केले आहे. यामध्ये दि . ७/१२/२०१९ रोजी संध्याकाळी सहा ते आठ खंडुजी महिला भजनी मंडळाचे भजन, दि. ८/१२/२०१९ रोजी संध्याकाळी सात ते नऊ डाॅ. सौ मंजिरी आलेगावकर प्रस्तुत भक्तीरंग, दि. ९/१२/२०१९ रोजी संध्याकाळी सात ते नऊ सौ. स्मिता रावललु प्रस्तुत भक्तीरंग, दि.१०/१२/२०१९ रोजी दुपारी १ ते ४ दत्त यज्ञ, संध्याकाळी ५ ते ७ भजन व संध्याकाळी ७ ते ९ श्रीराम जोशी प्रस्तुत सदगुरु महिमा, तसेच दि. ११/१२/२०१९ रोजी सकाळी ८ ते १० सत्यदत्त पुजा, भजन, सकाळी १० ते १२ ह.भ.प. श्री वाजता गणेशमहाराज कार्ले यांचे कीर्तन, १२ ते १२.३० दत्त जन्म सोहळा,महाआरती, १२.३० ते १० अन्नकुट महाप्रसाद,संध्याकाळी ५ ते ७ स्वरांजली महिला भजनी मंडळ प्रस्तुत भजन,संध्याकाळी ७ ते ९ स्वरारोही गृप तर्फे सौ. नयना देशपांडे प्रस्तुत गुरुवंदना असे दत्त जयंती उत्सवाचे सव॔ दत्त भक्त व अॅड. सतिश रानवडे व मित्र परिवारने आयोजन केले आहे व इतर धार्मिक कार्यांचा समावेश आहे. तसेच १००८ तुळशी रोपांचे वाटप देखील या दरम्यान करण्यात येणार आहे.
जयंतीनिमित्त मंदिर परिसरात भव्य विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे नियोजन एडवोकेट सतीश रानवडे व मित्रपरिवार, दत्तभक्त गण व औंध ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भक्तजन येथे भेट देत असतात.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा