दत्त जयंती आणि त्याचे महत्व….
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकार ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. आज दत्त जयंती निमित्त त्रिमूर्ती दत्तगुरूंबाबत जाणून घेऊया काही विशेष माहिती…
अत्रि ऋषी व त्यांची पत्नी अनसूया यांच्या पोटी जन्माला आलेले रत्न म्हणजे दत्त. त्यांचा देवता, असा उल्लेख पुराणांमध्ये आहे. एकच मानवी शरीराला ३ तोंडे अशी दत्तमूर्तीची रचना असते.
त्रिमूर्तीमध्ये एक दत्ताची आहे. दुसऱ्या दोन्हीपैकी एक दुर्वास व दुसरा सोम अशा दोन्ही भावांचाही समावेश असल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे. दत्ताचा उल्लेख त्यांचे साधक, परंपरेने गुरुदेव असा केला आहे.
दत्त त्रिमूर्तीचा अर्थ : दत्तमुर्तीच्या विशिष्ट रचनेबद्धल बहुदा कुतूहल व्यक्त होते. मात्र, हिंदू पौराणिक साहित्याचा आधार घेतल्यास, दत्त, सोम व दुर्वास या तिघांची एकत्र मूर्ती म्हणजे हा विष्णू, ब्रह्मा व शिव यांचा अवतार असल्याचा उल्लेख सापडतो. पूर्व काळात विष्णू म्हणून प्रचलित असलेले दत्त उत्तर काळात ब्रह्मा, विष्णु व महेश अशा तिन्ही देवांचे अंशरूप आहे.
अशी असते दत्तमुर्ती :
त्रिमुख दत्त देवता ही प्रामुख्याने औदुंबरा (उंबर) च्या झाडाखाली यज्ञकुंडासमोर वा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर ४श्वान मागे गाय असा परिसर दिसतो.
४ चार श्वानाचाअर्थ : हे ४श्वान हे वेद व शंकराचे भैरव मानले जातात. तर, स्वत: दत्त वाढेलेल्या दाढीत दिगंबर अवस्थेतही दिसतात.
पूजा मुहूर्त* – विधी वेळ : स. १०.५८ वाजता सुरू संपणार : पौर्णिमा १२ डिसेंबर दिवशी १०.४२ वाजता.