गोल पोस्ट महाराष्ट्र दाऊद इब्राहिमला ‘कोरोना, लष्करी रुग्णालयात उपचार सुरू

दाऊद इब्राहिमला ‘कोरोना, लष्करी रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई, दि.५ जून २०२०: मुंबई मध्ये १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय दाऊदसोबतच त्याच्या पत्नीलाही ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याचं एका मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

याबाबत पाकिस्तानमधील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले गेले आहे. दाऊदला कराचीमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

दाऊद आणि त्याची पत्नी मेहजबीन हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version