दौंड : गोशाळेतील जनावरांना चारा देवून ‘पत्रकार दिन’ साजरा !

दौंड , ६ जानेवारी २०२३ : दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दौंड तालुक्यातील केडगाव येथील बोरमलनाथ देवस्थान ट्रस्ट येथील बोरमलनाथ सभागृहामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

यावेळी बोरमलनाथ गोशाळेला पत्रकार संघाच्या वतीने एक दिवसाचा चारा देऊन अनोख्या प्रकारे हा दिवस साजरा झाला. यावेळी निवृत्त धर्मदाय आयुक्त देशमुख साहेब तसेच बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास शेलार यांच्या सह दौंड तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश वत्रे, परिषद प्रतिनिधी एमजी शेलार, जगदाळे पाटील आदी जेष्ठ पत्रकार उपस्थित होते.

तर पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर मधील विद्यार्थ्यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राजक्ता शिंदे व साई दीक्षित या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत माध्यमांचे महत्व सांगितले. तसेच प्राध्यापक डॉ. सुनीता बनकर यांनी समाजामधील वृत्तपत्रांचे महत्त्व व बदलत्या काळातील पत्रकारिता आणि समाजासाठी पत्रकारितेचे महत्त्व यावर आपले मत व्यक्त केले व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला प्राध्यापक विकास धुमाळ, प्राध्यापक प्रदीप बोत्रे, प्राध्यापक आरती सुतार तसेच पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार प्रकाश शेलार यांनी केले तर आभार अध्यक्ष रवींद्र खोरकर यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : निलेश जांबले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा