दौंडला वीजपुरवठा नियतपणे करावा,नागरिकांची मागणी.

दौंड, २९ जुलै २०२० : दौंड शहरात सतत खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील वीज पुरवठा सुरळीत करावा असे शहर व आसपासच्या ग्रामीण भागातून मागणी होत आहे. याबाबत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल जगदाळे यांनी विद्युत वितरण महामंडळाचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

सध्या शहरात बरसत असलेल्या सततच्या पावसामुळे दिवसातील अनेक तास वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरवासियांची तारांबळ होत आहे.तसेच शहराच्या आसपास असणाऱ्या अनेक गावांत देखील वीजपुरवठा खंडित होत असल्याने सध्या मुबलक पाणी असताना देखील शेतकऱ्यांना विजे अभावी नुकसान होत आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अंडरग्राऊंड केबल करण्यासाठी नगर परिषदेकडे विशेष तरतूद करुन काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू सदरचे काम अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.

वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्याबाबत शहर अभियंता यांच्याकडे विचारणा केल्यास पावसामुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे, अशा प्रकारचे उत्तर दिले जाते. तर अनेक वेळा वादळाने तुटलेल्या तारा जोडण्यासाठी लाईनमनकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे.

जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, उपनगराध्यक्ष वसीम शेख, राजेश जाधव, संजय चितारे, प्रशांत धनवे, अनिल साळवे हे यावेळी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा