एनआयएच्या विळख्यात दाऊद

मुंबई १० मे २०२२ : कुख्यात डॅान दाऊद … भारताच्सा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या रडारवरचे मोठे सावट. दाऊद याने पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता. याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने फेब्रुवारीमध्ये दाऊद आणि त्याचे निकटवर्तीय यांच्याविरोधात प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पण त्याचे पुढचे पाऊल एनआयएने उचलले असून त्यानुसार कारवाई सत्र सुरु झाले आहे. यावेळी दाऊदच्या एकाच वेळी २० जागांवर छापे टाकण्यात आले आहे. छोटा शकील आणि टायगर मेननच्या हवाला व्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुहेल खांडवाला आणि सलीम फ्रुट यांना हवाला प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

एनआयएच्या सूत्रानुसार दाऊदसह त्याच्या साथीदारांनी मोठ्या प्रमाणात हवालाद्वारे पैसा उभा केला असून त्या पैशाचा उपयोग ठिकठिकाणी बॅाम्बस्फोट घडवणे, राजकीय नेत्यांची हत्या, आणि जनतेमध्ये दहशत पसरवण्यासाठी करण्यात येत होता. त्यामुळे हे छापे टाकून दाऊदचे जाळे तोडण्याचा एनआयएचा सफल पराक्रम म्हणावा लागेल. यावेळी एनआयएने मुंबईत वांद्रे, नागपाडा, बोरिवली, परळ, गोरेगावसह तब्बल २० ठिकाणी छापे टाकले आहेत.

याच हवाला प्रकरणी नवाब मलिक यांनी दाऊदच्या जागेशी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी हा तपास ईडीकडे होता. मात्र फेब्रुवारीपासून हा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. सध्या एनआयएच्या रडाकवर छोटा शकील, जावेद चिकना,टायगर मेनन, दाऊदची बहिण हसीना पारकर, असून लवकरच त्यांच्या दहशतवादी कारवायांचाही तपास करणार आहे.

त्यामुळे आता एनआयएच्या हाती कुठले धागे-दोरे सापडतात, हे पहावं लागेल. पण एनआयएची ही कारवाई नक्कीच धडाकेबाज म्हणावी लागेल आणि आजच्या कारवाईतून काय निष्पन्न होणार पहावं लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा