गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई जे.जे.रुग्णालय गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद चा साथीदार ‘नजिर फकी’ला परदेशातून अटक

जे.जे.रुग्णालय गोळीबार प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद चा साथीदार ‘नजिर फकी’ला परदेशातून अटक

मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. दाऊदचा जवळचा नातेवाईक आणि साथीदार नजिर मोहम्मद फकी याला पोलिसांनी परदेशातून अटक केली आहे. ही कारवाई मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. नाजिर मोहम्मद हा १९९२ मध्ये मुंबईतील जे.जे. रुग्णालयात झालेल्या गोळीबारात प्रमुख आरोपी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजिर मोहम्मद फकी याचे कुठलेही छायाचित्र उपलब्ध नव्हते. गेल्या तीन दक्षकांपासून तो पोलीसांना चकवा देत होता, मात्र तब्बल तीन दशकानंतर तो एजन्सींच्या हाती लागला आहे. तसेच दाऊद इब्राहिमने त्यांची बहीण हसिना पारकरचा पती इस्माईल पारकर हिच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याचा वापर केला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version