तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दयाबेनला झाला गळ्याचा कॅन्सर?

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२ : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ही मालिका गेल्या चौदा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, १४ वर्षानंतर ही या मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सध्या मालिकेतील सर्वच पात्र चर्चेत आहेत. पण सध्या या मालिकेशी निगडित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, मालिकेतील दयाबेनची भूमिकेने लाखो चाहत्यांची मने जिंकणारी दिशा वकानी ची चाहते, शोमध्ये तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत असताना आता दिशा बद्दल एक बातमी समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार दिशा वकानी ला कॅन्सर झाला आहे.

गेल्या काही दिवसापासून दिशा ला गळयाचा त्रास होत होता. ती डॉक्टरांकडे उपचार घेत होती, पण आता दिशाला गळ्याचा कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तीचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

मात्र या बातमीत कोणतीही तथ्य नसल्याच्या तारक मेहता शो मध्ये जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी सांगितलं आहे. तसेच याबाबत दिशा कडून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दिशा वकानी ने २०११ मध्ये एका इंटरव्यू मध्ये तिच्या विचित्र आवाजाबद्दल भाष्य केले होते. यावेळी ती म्हणाली हे खूप कठीण आहे, कारण मी दिवसाचे दहा ते बारा तास सतत काम करत असते. आणि सारखा तोच आवाज ठेवण आणि त्याचं आवाजात बोलणे हे फार कठीण काम आहे. आणि यामुळे कधी कधी गळ्याचा त्रास देखील सहन करावा लागतो.प्रत्येक वेळी मला माझ्या आवाजाची पातळी राखणे फार कठीण होते. पण देवाच्या कृपेने कधीही माझ्या आवाजाला कोणतीहि हानी झालेली नाही. तसेच मला कधीही घशाचा कर्करोगाचा सामना करावा लागलेला नाही.

दरम्यान दिशा वकानी गेल्या अनेक वर्ष ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये दयाबेन ची भूमिका साकारत आहे. ती २००८ पासून या शो मध्ये काम करत होती. दिशा वकांनी २०१७ मध्ये लग्नानंतर काही दिवस मालिकेत काम केले, त्यानंतर तिने ब्रेक घेतला आणि ती आई झाली. त्यानंतर मुलाकडे लक्ष देण्यासाठी तिने सिरीयल मधून ब्रेक घेतला होता. अस शो चे प्रोडूसर असित कुमार मोदी यांनी सांगितलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा