पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दौंड येथे आयोजन

पुणे : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे व नायगांव एज्युकेशन सोसायटीचे दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय, दौंड जि. पुणे आणि ग्रॅव्हिटी कन्सल्टन्टस नारायण पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालय दौंड, जि. पुणे येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, जेजुरी, कुरकुंभ व पुणे शहर या औद्योगिक परिसरातील एकूण २४ उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडून एकूण ७०१ रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत.
पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता या मेळाव्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यास्तव किमान ७ वी पास ते १० वी १२ वी पास/नापास व एमसीव्हीसी पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, बीई, एमबीए, एम.फार्म, सीएनसी ऑपरेटर इ. पात्रता धारण केलेल्या या परिसरातील विशेषत: अल्पसंख्याक तसेच इतरही सर्वच उमेदवारांनी देखील मंगळवार दि. २४ डिसेंबरच्या मेळाव्याअंतर्गत खाजगी क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या जागांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या सहायक संचालक तसेच दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

या मेळाव्या अंतर्गत महिला उमेदवारांनाही प्राधान्याने नामांकित उद्योजकांकडे रोजगार मिळण्याच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुलाखतीस येताना उमेदवारांने आपली सर्व मुळ शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, अर्जाच्या व आधारकार्डाच्या प्रती सोबत आणाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा