डी मार्टच्या नफ्यात ८८ टक्क्यांची घट

नवी दिल्ली, दि. १२ जुलै २०२०: कोरोना व्हायरस, लॉकडाऊनमुळे देशाच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. मार्च महिन्यापासून व्यवहार कमी होत असून याचा अनेक कंपन्यांना मोठा फटका बसतो आहे. लॉकडाऊनचा फटका डी मार्टलाही बसला आहे. डी मार्टची चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आकडेवारी समोर आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत डी मार्टच्या नफ्यात ८८ टक्क्यांची घट झाली आहे.

कोरोना व्हायरसमुळे एप्रिल ते जूनच्या तिमाहीत डी मार्टला ४० कोटी रुपये नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच एप्रिल-जून तिमाहीत कंपनीला ३२३.६ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात महसूल ३३.२१ टक्क्यांनी कमी होऊन तो ३,८८३.१८ कोटींवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत महसूल ५८१४.५६ कोटी इतका होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा