बंदेमठात आढळला लिंगायत संत बसवलिंग स्वामींचा मृतदेह

22

बेंगळुरू, २५ ऑक्टोबर २०२२: कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटक मधील रामनगर जिल्ह्यात एका लिंगायत संताचा मृतदेह सापडला आहे. श्री कंचुगल बंदेमठातील लिंगायत संत बसवलिंग स्वामी सोमवारी त्यांच्या आश्रमात मृतावस्थेत आढळून आले. ते ४५ वर्षांचे होते. कुडूर पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवलिंग स्वामीजी यांचा मृतदेह मठात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, कंचुगल बंदेमठाचे मुख्य पुजारी बसवलिंग स्वामींनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. यानंतर भाविकांना संशय आल्याने सोमवारी सकाळी स्वामींच्या खोलीचा दरवाजा तोडण्यात आला.

अनैसर्गिक मृत्यूची नोंद!

दरम्यान, ही घटना आत्महत्या मानून पोलीस तपास करत असून अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना दोन पानांची सुसाईड नोट सापडली आहे. काही लोक माझा छळ करत आहेत आणि मला मुख्य पदावरून हटवण्याचा त्यांचा हेतू आहे, असे त्या सूसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

२५ वर्षांपासून मठाचे पुजारी

बंदेमठ ४०० वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. बसवलिंग स्वामी हे गेल्या पंचवीस वर्षांपासून मठाचे पुजारी होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा