पुणे, दि.१० सप्टेंबर २०२०:अंतिम सत्र वर्षातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइनपद्धतीने सुद्धा परीक्षा देता येणार आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षांबाबत विकल्प अर्ज भरण्याची मुदत रविवार १३ सप्टेंबर २०२० पर्यंत ठेवण्यात आलेली आहे .पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडी वरून विकल्प अर्ज उपलब्ध करून तो विद्यार्थी भरू शकणार आहेत.
ऑनलाइन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये देशभरातील परदेशातील विविध अभ्यासक्रमांसाठी इतर राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात .पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयातील अशा विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या कोविड १९ प्रादुर्भाव लक्षात घेता अंतिम वर्षातील सर्व पात्र विद्यार्थ्यांकरिता विद्यापीठाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचा लॉग इन आयडीवरून विकल्प अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ चे संचालक महेश काकडे यांनी दिली.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार कुलपती तथा राज्यपाल यांच्या व महाराष्ट्र शासनाने दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी सूचित केल्याप्रमाणे अंतिम सत्र तीन वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा नियमित व अनुशेष आंतर्गत लेखी परीक्षा तसेच प्रॅक्टिकल/ मौखिक /प्रकल्प /चर्चासत्र या परीक्षांच्या आयोजनाबाबत अधिकार मंडळाने मान्यता दिली असून, त्यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंतिम सत्र वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे