बारामती, १२ डिसेंबर २०२०: बारामती तालुका व शहर मातंग समाजाच्या वतीनं नांदेड येथील बिलोल गावातील साठेनगर मधील मुकबधीर मुलीवर अमानवीय अत्याचार करून ठार करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करण्याचं निवेदन दि. १२ शनिवारी बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना देण्यात आलं.
नांदेड मधील बिलोल गावातील साठेनगर मधील मातंग समाजाच्या मूकबधिर मुलीवर अत्याचार, अमानवीय अत्याचार करून हे नराधम थांबले नाहीत तर त्यांनी त्या असहाय्य मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी असुन, पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराध्यमांवर शक्ती कायद्यानुसार कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे.
यावेळी सोमनाथ पाटोळे, केदार पाटोळे, अभिषेख खरात, अतुल गायकवाड, सुरेश बगाडे, आदित्य खरात, सतीश सकट, अजय खरात, राहुल खरात उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव











































