गोल पोस्ट इतर प्रिय दीपूजी, मला पळवुन न्या, तुमची पुष्पा I LOVE YOU…..

प्रिय दीपूजी, मला पळवुन न्या, तुमची पुष्पा I LOVE YOU…..

पुणे, २६ एप्रिल २०२१: प्रेमात कोण काय करंल याचा नेम नाही आणि त्यात देशात कधी काय व्हायरल होईल हे ही सांगता येणार नाही. मागं काही वर्षांपूर्वी एक नोट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती ज्यावर लिहिलं गेलं होतं “सोनम गुप्ता बेवफा है”.आता असाच एक प्रकार समोर आला आहे. ज्या मधे पुन्हा एकदा ती नोट व्हायरल होत आहे.

सध्या २० रूपयांच्या नोटावरती आपल्या प्रियकराला प्रियसीनं एक मेसेज लिहीला. पुष्पा असं तीचं नाव असून सध्या ती चर्चेचा विषय ठरलीय. नोटावर तिनं आपला प्रियकर दिपूला लिहीलेला मेसेज स्पष्टपणे वाचता येतोय. दिपूला पुष्पा स्वताच्या लग्नाबद्दल माहिती देत आहे. या २० रूपयाच्या नोटावर असं लिहिलं आहे कि,

“प्रिय दिपू जी..! माझं लग्न २० एप्रिलला आहे, मला तुमच्या सोबत पळवुन घेऊन जा. तुमचीच पुष्पा आय लव्ह यू”. ही नोट कुठली आहे या बद्दल अजून काही माहिती हाती आली नाही. पण, सध्या या पुष्पा आणि दिपू च्या प्रेमाची चर्चा देशभर चालू आहे. तर अधीच देशात कोरोनानं थैमान घातला आहे आणि यात प्रेमी युगुल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अश्या वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version