केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ

नवी दिल्ली, १५ जुलै २०२३ : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही घोषणा सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेज कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. महागाईच्या काळात त्यांना मदत व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते. सध्या जी महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ती १ जुलै २०२३ पासून ही वाढ लागू होणार आहे.

बिझनेस टुडेच्या माहितीनुसार, सेंट्रल पब्लिक एंटरप्राइजेजच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा १९९२ आईडीए नुसार करण्यात आला आहे. १ जुलै २०२३ पासून नवीन दरानूसार ३,५०० रुपये प्रति मुळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ७०१.९% म्हणजे १५,४२८ लागू होणार आहेत. ३५०१ रुपयांपासून ६,५०० रुपये महिना वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५२६.४% म्हणजे २४,५६७ रुपये लागू होणार आहेत.

त्याच्यानंतर ६,५०० रुपये ९,५०० रुपये बेसिक वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४२१.१% वाढ होईल, ती रक्कम ३४,२१६ रुपये असेल. ९,५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३५१% असेल. तो ४०,००५ रुपये असेल. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्याची गणना सध्याचा डीए आणि मूळ पगाराच्या गुणाकाराच्या आधारे केली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा