सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचे आमरण उपोषण रद्द

बारामती, ७ जानेवारी २०२१: ग्रामीण मंडळ ऊर्जा भवन नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांना परिपत्रका प्रमाणे शासनाने दिलेल्या पन्नास टक्के राखीव कामे मिळत नसल्याची तक्रार केली. या ठेकेदार अभियंत्यांनी ३० डिसेंबर रोजी पत्र देऊन ३ जानेवारी पर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा ५ जानेवारी पासून ऊर्जा भवन येथे आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांच्याकडे दिले होते.

सुशिक्षित अभियंते ठेकेदार बिंटू कोकरे व अविनाश चांदगुडे यांनी तक्रार केल्याप्रमाणे शासनाने दिलेल्या २०१५ – १६ ला जाहीर केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची ठेकेदार म्हणून नोंद करण्यात आली आहे. येथील अधीक्षक अभियंता यांनी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना परिपत्रकाप्रमाणे एम्पलमेंट टेंडर मध्ये समाविष्ट करून घेत असल्याचे पत्र संबंधित विभागाला दिले.

शासनाने ठरवून दिल्या प्रमाणे पन्नास टक्के कामे मिळावी,तर अभियंत्यांना चालू ऑर्डर प्रमाणे कामे मिळावीत अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार विद्युत अभियंता ठेकेदार संघटना बारामती परिमंडळ यांच्या वतीने करण्यात आली होती. या संदर्भात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, अधीक्षक अभियंता यांनी आधीच उपोषणकर्त्यांशी चर्चा करून मागण्या पूर्ण करीत असल्याचे पत्र दिले.

अधीक्षक अभियंता यांनी त्यांचे कौशल्य वापरून सुशिक्षित बेरोजगार सर्व अभियंत्यांना नियमित कामाची उपलब्धता होणार असल्याचे सांगत उपोषण कर्त्याना पत्र दिले तर कोकरे यांनी अधीक्षक अभियंता पाटील यांचे आभार मानले

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा