विहिरीत पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू

बीड,दि.१० मे २०२० : केज तालुक्यातील काळेगावघाट येथे एका परप्रांतीय मजुराचा विहिरीत बडून मृत्यू झाला. हा मजूर विहिरीवर आंघोळीसाठी गेला होता. पोहता येत नसतांनाही विहिरीत दोरीच्या सहाय्याने उतरण्याचा प्रयत्न केला आणि तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

शमीम राज (वय २१, उत्तरप्रदेश) असे मृत पावलेल्या मजुराचे नाव आहे. केज तालुक्यातील काळेगावघाट येथील नितीन लक्ष्मण तांदळे यांचे आळंदी रोड मोशी, पुणे येथे माऊली फर्निचर या नावाचे फर्निचर तयार करण्याचा कारखाना आहे. शमीम त्यांच्याकडे सहा महिन्यापासून कामाला होता. दरम्यान लॉकडाऊन असल्यामुळे पुणे येथील काम बंद होते.

लॉकडाऊन असल्यामुळे उत्तर प्रदेशकडे जाणार्‍या सर्व गाड्या बंद असल्यामुळे तो त्याच्या गावी न जाता नितीन तांदळे यांच्या सोबत तो एक महिन्यापासून काळेगाव घाट येथे रहात होता. शनिवारी दुपारी तो आंघोळीसाठी येथील बोभाटी नदी पात्रातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर गेली. त्याने विहिरीवरील रहाटाला दोर बांधून विहिरीत उतरून अंघोळ करीत असताना तोल जाऊन पडून त्याचा मृत्यू झाला.

घटना स्थळावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव, अमोल गायकवाड आणि सिरसट यांनी भेट देवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घातपात आहे की, अन्य काही प्रकार याचा तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा