नीरा वाल्हे दरम्यान एका प्रवाशी वृद्धाचा मृत्यू

पुरंदर दि. २७ ऑगस्ट २०२०: नीरा – वाल्हे दरम्यान पायी चालत जाणाऱ्या एका प्रवाशी वृद्धाचा मृत्यू झाला आहे. पिंपरे गावच्या हद्दीमधील जेऊर फाट्यावर ही घटना घडली. याबाबतची माहिती पिंपरे खुर्दच्या पोलीस पाटील यांनी नीरा पोलिसांना दिली आहे
     
 
आज दुपारी जेजुरी येथील एक वृद्ध पायी जेजुरीकडे निघाला होता. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने जेऊर फाट्यावरील एका दुकानाच्या आश्रयाला तो थांबला. दुकानदार प्रकाश जाधव यांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता ‘मला थोडा वेळ झोपू द्या.’ असे तो म्हणाला यावर त्यांनी तुम्हाला काही हवे आहे का ?पाणी देऊ का? काही खायला देऊ का? अशीही विचारणा केली. मात्र ”मला काही नको फक्त दहा मिनिटे इथे झोपुद्या” अशी विनंती त्यांनी केली. दीड तासानंतर त्या वृद्धाला फिट आल्यासारखे होऊ लागले. एका प्रवाशाने ही गोष्ट जाधव यांना सांगितली यानंतर त्यांनी त्याला मदतीसाठी विचारणा केली. मात्र थोड्याच वेळात त्याची प्राणज्योत मालवली.
      
हा वृद्ध जेजुरी येथील असून त्याचे नाव सुदम यशवंत भिसे असल्याचे त्याच्याकडील मतदान ओळख पत्रावरून स्पष्ट होत आहे. याबाबतची खबर पिंपरे खुर्दचे पोलीस पाटील रूपाली सोनवणे यांनी पोलिसात दिल्यानंतर सहाय्यक फौजदार राजेंद्र भापकर, पोलीस हवालदार सुदर्शन होळकर, पोलीस शिपाई निलेश जाधव, नीरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी घटनास्थळी धाव घेत वृद्धाचा मृतदेह जेजुरी येथे पुढील कार्यवाहीसाठी नेला आहे.
 
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा