आणखी एक हत्तीचा मृत्यू, जबड्यात फ्रॅक्चर, फटाके खाल्ल्याची शक्यता

केरळ, दि. ५ जून २०२०: केरळमध्ये गर्भवती मादी हत्तीच्या निधनानंतर पुन्हा असेच एक प्रकरण समोर आले आहे. या हत्तीला जबड्यात फ्रॅक्चर झाले आहे. सध्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही, याचा शोध घेतला जात आहे.

वृत्तसंस्था, पीटीआय च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांना ही मादी हत्ती पठाणपुरमच्या जंगलातील ओढ्याजवळ सापडली. वन अधिकारी म्हणाले की ती खूप कमकुवत झाली होती. आम्ही तिला काही औषध देण्याचा प्रयत्न केला पण ती कोसळली.

एका महिन्यापूर्वी या हत्तीला जबड्याला फ्रॅक्चर झाले होते असे पोस्टमार्टमवरून दिसून आले आहे. हे फ्रॅक्चर तिनी खाल्लेल्या एखाद्या खाद्यपदार्थातून होऊ शकते असे सांगितले गेले. तरीही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

विशेष म्हणजे केरळमधील मल्लपुरममधून माणुसकीला काळीमा फासणारे एक चित्र समोर आले आहे. येथे, एक गर्भवती मादी हत्ती अन्नाच्या शोधात जंगलाजवळील गावात आली, परंतु तेथे टवाळकी करणार्‍या माणसांनी अननसात फटाके भरले आणि हत्तीला खायला घातले, ज्याने तिच्या तोंडाला आणि जबडाला गंभीर दुखापत झाली.

वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार स्फोटकामुळे तिचे दातही तुटले होते. यानंतरही मादी हथिनीने गावातील कोणाचेही नुकसान केले नाही आणि तिने वेलीयार नदी गाठली, जिथे ती तीन दिवस पाण्यात उभी राहिली. नंतर तिचा आणि न जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मादी हत्ती १४-१५ वर्षांची असावी. २५ मे रोजी वन अधिकाऱ्यांना ही मादी हत्ती मिळाली. २७ मे रोजी नदीत उभी राहिली असताना तिचा मृत्यू झाला. वनविभागाने तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा