ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाईन द्वितीय यांचे निधन

यूनान, ११ जानेवारी २०२३ : ग्रीसचे शेवटचे राजा कॉन्स्टंटाईन द्वितीय यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कॉन्स्टंटाईन द्वितीय हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रीस इतिहासात अंशात कालखंडामध्ये कॉन्स्टंटाईन द्वितीय यांची कारकीर्द पाहिली जाते. ग्रीसचे माजी राजा किंग पॉल आणि राणि फ्रेडरिका यांचे कॉन्स्टंटाईन पुत्र होते. १९६४ साली राजा किंग पॉल यांचे निधन झाले. त्यामुळे कॉन्स्टंटाईन यांना वयाच्या २३ व्या वर्षी द्वितीय राजाचा मान देण्यात आला. अशात २१ एप्रिल १९६७ रोजी लष्करी उठाव झाला. यावेळी कॉन्स्टंटाईन यांना राजाची गादी सोडावी लागली.

या दरम्यान, नागरिकांवर होणारा अन्यय आणि पुरेशा नसलेल्या सुखसोयीस लक्षात घेता पुन्हा एकदा कॉन्स्टंटाईन द्वितीय हे ग्रीसचे राजा ठरले. त्या आधी १९७४ मध्ये कोन्स्टँटिनोस कॅरामॅनलिस यांच्या नेतृत्वात जनता चाचणी घेण्यात आली होती. यावेळी जनतेने त्यांना नाकारले आणि कॉन्स्टंटाइन द्वितीय हे ग्रीसचे शेवटचे राजा ठरले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा