महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जीवे मारण्याची धमकी

पुणे, ११ एप्रिल २०२३: काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. कॉलवरून धमकी देणाऱ्याने मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असे बोलून कॉल कट केला. या प्रकारामुळे पोलिस सतर्क झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली.

तपासानंतर पोलिसांना समजले की, राजेश आगवणे असे आरोपीचे नाव आहे. राजेशने नशेत असताना पुण्यातून हा कॉल केला होता. त्याचे वय ४२ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. तो व्यवसायाने वॉर्ड बॉय म्हणून काम करत आहे आणि मुंबईतील धारावी परिसरात राहतो. त्याची पत्नीही एका खासगी कंपनीत काम करते.

आरोपीने (राजेश आगवणे) पुणे येतून नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर फोन केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ११२ वर कॉल करून छातीत दुखत असल्याचे सांगून त्यानी रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, त्यानंतर आरोपीने पुन्हा फोन करून सीएम शिंदे यांना उडवून देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. माहितीनुसार, नागपूर कंट्रोलला (११२) हा कॉल आला होता. यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलीस आरोपीच्या घरी पोहोचले पण तेव्हा त्याच्या धारावीतील घराला कुलूप होते. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेतले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा