राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

पुणे, १३ डिसेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली. आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीने सिल्व्हर ओक’ वर फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रेस करण्यात आले असून, हा व्यक्ती बिहारचा असल्याची माहिती समोर येत आहे.

दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात २९४, ५०६ (२) भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा