शुभमंगल सावधान

डिसेंबर महिना हा जसा गुलाबी थंडीचा मानला जातो, तसा तो लग्नसराईचा म्हणून मानला जातो. याचसाठी आता सेलिब्रिटी , राजकारणी सगळ्यांनी डिसेंबर महिना विवाहासाठी निवडला आहे. नोव्हेंबरच्या शेवटापासून ते डिसेंबर शेवटपर्यंत ही लग्न सराई सुरुच राहणार आहे. यांची सुरुवात झाली गायिकां शाल्मली खोलगडे हिच्या विवाहापासून . शाल्मलीमे आपला मित्र फरहान शेख याच्या बरोबर नुकतीच लग्नगाठ बांधली. हा विवाह दोन्ही धर्माच्या परंपरेनुसार पार पाडला. निवडत लोकांच्या उपस्थितीत हा विवाह झाला.
यानंतर संजय राऊत यांच्या कन्येचा विवाह नुकताच ठाण्यात संपन्न झाला. पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांचा विवाह नुकताच पार पडला. शाही थाटात पार पडलेल्या या समारंभाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह अनेक राजकारणी नेत्यांनी हजेरी लावली होती.
जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. ना शाही थाट, ना गाजावाजा . केवळ आठ लोकांमघ्ये हा विवाह पार पडला. नताशा आणि एलन पटेल यांनी  नोंदणी पद्धतीने विवाह करुन जनतेसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.
त्यानंतर सध्या चर्चेत असलेला विवाह म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. ७ ते ९ डिसेंबर हा विवाह सोहळा राजस्थानात शाही थाटात पार पडत आहे. अनेक प्रकारच्या चर्चांना या विवाहापूर्वी उधाण आलं होतं . पण अखेरीस या विवाहामुळे सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला. कतरिना आणि विकी कौशल यांनी शाही थाटात राजस्थानमध्ये विवाहगाठ बांधली.
पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. सुशांत सिंह नंतर तिची गाठ आता उद्योगपती विकी जैन बरोबर बांधली जाणार असून १४ डिसेंबरला हा विवाह धार्मिक पद्धतीने पार पडणार आहे. सोशल निडीयावर अंकिताने आपल्या हळदीचे फोटो देखील अपलोड केले आहेतं
या नंतर लवकरच हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत पुत्र जयदेव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांच्या समवेत हा विवाह संपन्न होणार आहे. २८ डिसेंबरला हा विवाह मुंबईत होणार आहे.
एकुणातच डिसेंबर महिन्यात हे विवाह झाले आणि होणार असून या सर्व दांम्पत्यांना जनतेचे आशिर्वाद लाभले आहे आणि लाभणार आहे.
एकुणातच हा महिना शुभमंगल महिना म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा