पूर्व तयारी शिवाय लॉक डाऊन चा निर्णय.

नवी दिल्ली ,दि. २५ एप्रिल २०२०: चीन मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये कोरोनाचे संकट आले होते. जानेवारी महिन्यामध्ये हा व्हायरस सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये राहुल गांधी यांनी याबाबत नरेंद्र मोदी यांना दक्षता घेणे विषयी सुचवले सुद्धा होते. परंतु त्यावेळेस राहुल गांधी यांच्या बोलण्याकडे भाजप सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आले होते. मार्च महिन्याच्या शेवटच्या काळात नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देशव्यापी लॉकडाऊन घोषित केले. नरेंद्र मोदी यांनी अचानक केलेल्या या लॉकडाऊन बाबत बोलताना काँग्रेसने भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने असे म्हटले आहे की नोटबंदी प्रमाणेच मोदी सरकारने हा निर्णय देखील कोणताही विचार न करता घेतला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे देशाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की या अचानक करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे जवळपास १४ कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. इतकेच नव्हे तर येणाऱ्या काळात अजूनही लाखो नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. भाजप सरकार कडे या बेरोजगार झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी काही योजना आहे का असा प्रश्न काँग्रेसने केला आहे?

सर्वप्रथम काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी शनिवारी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. कपिल सिब्बल म्हणाले होते की, कोरोना चे संकट गेल्यानंतर भारतासमोर एक नवीन आव्हान उभे राहिलेले असेल. एक नवीन भारत आपल्यासमोर उभा असेल. अशा वेळेस मागच्या गोष्टी म्हणजेच एनसीआर, सीएए यांसारख्या गोष्टी सध्यातरी मागेच ठेवाव्यात आणि सध्या समोर येऊन ठाकलेल्या नवीन समस्यांकडे लक्ष द्यावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या नवीन समस्यांकडे लक्ष द्यावे तसेच विपक्ष, सत्ताधारी पक्ष आणि इतरांनी मिळून या नवीन संकटाचा सामना करावा.

माजी कायदामंत्र्यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरे जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत राष्ट्रीय आराखडा तयार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. ते म्हणाले की आता सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. लोकांना आणि अर्थव्यवस्थेला लॉकडाउन मध्ये ठेवून आता चालणार नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा