वडीगोद्री २९ जानेवारी २०२५: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील याच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला मंगळवारी मध्यरात्री त्याची तब्येत खालावल्याने उपोषण स्थळीच तातडीने सलाईनदवारे उपचार सुरु कारणात आले डॉक्टराच्या माहितीनुसार रात्रीपासून सकाळपर्यंत त्यांना सहा सलाईन लावण्यात आल्या आहेत
रात्री उशिरा भाजप आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी धाव घेतली आणि मनोज जरांगेंशी दीर्घ चर्चा केली. त्यांनी सलाईन घेण्याचा आग्रह धरला, मात्र पहिल्यांदा मनोज जरांगेंनी तो ठामपणे नाकारला. मात्र, डॉक्टरांचा सल्ला आणि आंदोलकांचा आग्रह पाहता त्यांनी अखेर उपचारास संमती दिली.
यावेळी मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, सरकारला लवकर निर्णय घ्यावा लागेल, अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मनोज जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मराठा समाजाच्या भवितव्यावर सरकार काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे!
न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे











































