किरकोळ महागाईत घट, पण तरीही RBI च्या कक्षेबाहेर

नवी दिल्ली, 13 जुलै 2022: भारतातील किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. जून महिन्यात महागाईचा दर 7.01 टक्के होता, जो मे महिन्याच्या तुलनेत 0.3 टक्के कमी आहे. मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.04 टक्के होता. पण सलग सहाव्यांदा महागाईचा दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्धारित केलेल्या लक्ष्य मर्यादेपेक्षा जास्त आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्के होता. जूनमध्ये अन्नधान्य महागाई 7.75 टक्के होती, जी मेमध्ये 7.97 टक्के होती.

रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त

रिझर्व्ह बँकेने 2022-23 साठी महागाईचा अंदाज 5.7 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सरकारने RBI ला किरकोळ महागाई 2 टक्क्यांच्या फरकाने 4 टक्क्यांवर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरबीआयने किरकोळ महागाई दर 6 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते.

अन्न महागाईत घसरण

CPI आधारित महागाई मे महिन्यात 7.04 टक्के, एप्रिलमध्ये 7.79 टक्के, मार्चमध्ये 6.95 टक्के, फेब्रुवारीमध्ये 6.07 टक्के आणि जानेवारीमध्ये 6.01 टक्के होती. अन्नधान्य महागाई, जी सीपीआय बास्केटच्या जवळपास निम्मी आहे. त्यात थोडी घट झाली आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर जूनमध्ये 7.75 टक्क्यांवर घसरला आहे, जो मागील महिन्यात 7.97 टक्क्यांवर होता.

सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते

जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने इंधन दरात कपात केली होती. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर राज्यांनीही व्हॅट कमी केला आहे. तेव्हापासून महागाईचा दर खाली आला आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नुकतेच सांगितले की, देशातील महागाई ऑक्टोबरपासून खाली येऊ लागली आहे.

रेपो दरात वाढ

कोरोना महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती दयनीय झाली आहे. मात्र, त्यात हळूहळू रिकव्हरीची नोंद होत आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्यातच रेपो दरात वाढ करण्यात आली होती. यानंतर देशातील जवळपास सर्वच बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली होती. जूनमध्ये रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढल्यानंतर तो 4.90 टक्के झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा