अलीबाग, २० नोव्हेंबर २०२० : राज्यातल्या स्थानिक लोकाधिकार समितीने विविध उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम हाती घ्यावे, त्यासाठी समर्पित आणि अद्ययावत कौशल्यविकास प्रशिक्षण संस्था स्थापन करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. ते अलीबाग इथल्या वर्सोली गावात बांधण्यात आलेल्या विश्रामगृहाच्या ई लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
भारतीय विमा कर्मचारी संघटना आणि स्थानिक लोकाधिकार समिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून अलिबाग येथील न्यु इंडिया इन्शुरंस कंपनीनं “दैवत” या नावाच हे विश्राम गृह बांधलं असून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच ई लोकार्पण करण्यात आलं यावेळी न्यु इंडिया इन्शुरंस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल सहाय, खासदार अनिल देसाई, स्थानिक लोकाधिकार समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रीय माणसाला विशेषत: मराठी माणसाला त्याचा हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकाधिकार समितीने जो संघर्ष केला त्यातून आज कंपनीमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. असंही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. अनलॉक प्रक्रियेमध्ये राज्याच्या उद्योग क्षेत्रात सर्वाधिक ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी