नवी दिल्ली, १० फेब्रुवरी २०२१: लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा मुख्य आरोपी दीप सिद्धू याला मंगळवारी तिस हजारी कोर्टात हजर करण्यात आले असता पोलिसांनी दहा दिवसांच्या रिमांडची मागणी केली. मात्र कोर्टाने दीप सिद्धू यांना ७ दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे. तीस हजारी कोर्टात सुनावणी दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोर्टाच्या कामकाजादरम्यान कोर्टाने पोलिसांना थोड्या काळासाठी चौकशी करण्याची परवानगी देखील दिली जेणेकरुन पोलिसांना पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगता येईल. यावेळी दीप सिद्दू यांना विचारले गेले की, लाल किल्ल्यावर जाण्यासाठी लोकांना कसे बोलावले गेले, योजना कशी तयार केली? त्यांच्या मोबाइल नंबरवर बद्दलही चौकशी केली गेली.
कट केल्यानंतर १५ दिवस फरार असलेले दीप सिद्धू यांना मंगळवारी पंजाबच्या जिकारपूर येथून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीप यांची पत्नी आणि कुटुंबीय पूर्णियामध्ये आहेत. दीप सिद्धू यांनाही तिथे जाण्यात रस होता. गुन्हे शाखेच्या चौकशीत दीप सिद्धू यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.
चौकशी दरम्यान दीप सिद्धू यांनी यांनी सांगितले की, भावनिक होऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये ते सामील झाले होते. तथापि, चौकशी दरम्यान दीप सिद्धू यांनी हे स्पष्ट केले की ते कोणत्याही कट्टरपंथी संघटनेशी संबंधित नाहीत, परंतु तोडफोड करण्याच्या विचारधारेवर त्यांचा विश्वास आहे. दीप सिद्धू म्हणाले की, त्यांना संशय आला होता की, शेतकरी नेते सरकारशी चर्चेत नरम होत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे