माढा, सोलापूर २४ डिसेंबर २०२३ : सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावाच्या दीपाली दत्तात्रय लंगोटे यांची, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून दुय्यम निबंधक श्रेणी-१ या पदावर निवड झाल्याबद्दल अकोले खुर्द येथील यश बजार येथे त्यांचा शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील परिवारातर्फे सन्मान करण्यात आला.
त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळा, टेंभुर्णी येथे झाले. त्यांनी बीई कॉम्प्युटर ही पदवी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या कॉलेजमधून पूर्ण केली आहे. यानंतर त्या पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत होत्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत दुय्यम निबंधक श्रेणी-१ हे एकच पद होते. ते दीपाली लंगोटे यांनी पटकावले आहे. त्यांचे वडील दत्तात्रय लंगोटे हे भारतीय आयुर्विमा महामंडळात विकास अधिकारी होते.
या यशाबद्दल दीपाली लंगोटे यांचा यश बजार अकुले खुर्द येथे, मा सरपंच नंदराम पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील व महेश पाटील परिवार यांनी सहकुटुंब सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रा पं सदस्य उज्वला पाटील, संतोष मासाळ, योगेश महाडिक, यश पाटील, गणेश भिसे आणि ग्रामस्थ यांनी दिपाली चे अभिनंदन केले.
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील