फलटण तालुक्यातील ऐतिहासिक जिंती गावातील काळभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने जितोबा मंदिरात दीपोत्सव

फलटण, सातारा ७ डिसेंबर २०२३ : फलटण तालुक्यातील ऐतिहासिक असणाऱ्या जिंती गावातील काळभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने जितोबा मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काळभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने जीतोबा मंदिरात हजारो पणत्या नीं मंदिर परिसर उजळला.

फलटण तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव म्हणून जिंती गावाची ओळख आहे या जिंती गावचे ग्रामदैवत श्री जितोबा होय या जितोबा मंदिरामध्ये आजही अनेक परंपरा जपल्या जातात प्राचीन काळापासून असणाऱ्या सर्व परंपरा आजही मोठ्या उत्साहाने पार पाडल्या जातात महाराष्ट्र मध्ये जिंतीचे बगाड प्रसिद्ध आहे त्याचबरोबर काळभैरवनाथ जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध जितोबा मंदिरामध्ये हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिंती गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनीं उपस्थिती लावली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी :आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा