क्यूआरएसएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, संरक्षण मंत्र्यांनी डीआरडीओचं केलं अभिनंदन

चांदीपूर, १८ नोव्हेंबर २०२०: भारतानं आपली संरक्षण शक्ती वाढविताना मंगळवारी एका भव्य आणि वेगवान शस्त्राची यशस्वी चाचणी केली. क्विक रिएक्शन सरफेस टू एयर मिसाइल (Quick Reaction Surface to Air Missile – QRSM) ची भारतानं यशस्वीरित्या चाचणी केली. यावेळी क्यूआरएसएम क्षेपणास्त्रा’नं हवेतील मानवरहित विमानांना लक्ष्य केलं.

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना ट्विट करून संरक्षण अनुसंधान व विकास संघटनेचे (डीआरडीओ) क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचणी बद्दल अभिनंदन केलं आहे. राजनाथ म्हणाले की, डीआरडीओ’नं क्यूआरएसएम क्षेपणास्त्र प्रक्षेपित करून मोलाचं यश गाठलं आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीपासून हवेत मारा करणारे शस्त्र आहे.

राजनाथ सिंह यांनी लिहिले की डीआरडीओने सलग दोनदा क्यूआरएसएमची यशस्वी चाचणी करुन आपली शक्ती दर्शविली आहे. आजच्या चाचण्या या क्षेपणास्त्राच्या रडारची नेमकी कामगिरी आणि थेट हल्ल्याच्या क्षमतेची माहिती देतात. या क्षेपणास्त्रानं हवेत थेट मानव रहित विमानांना लक्ष करीत आपली क्षमता दर्शविली आहे.

ओडिशाच्या चांदीपूर श्रेणीत डीआरडीओ’नं क्यूआरएसएम क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूची क्षेपणास्त्रं, विमानं, हेलिकॉप्टर आणि ३ किमी ते ३० कि.मी. अंतरावर येणारी ड्रोन्स नष्ट करू शकते.

क्यूआरएसएम क्षेपणास्त्राची लांबी ९८ फूट आहे. सर्वात धोकादायक म्हणजे त्याचा वेग. हे क्षेपणास्त्र शत्रूवर ४.७ मॅकच्या वेगानं हल्ला करते. म्हणजेच ताशी ५७५८ किलोमीटर वेगानं ते शत्रूच्या दिशेनं जातं. म्हणजे सेकंदात सुमारे २ किलोमीटर अंतर कापलं जाईल. इतक्या वेगानं हल्ला करणं म्हणजे शत्रूला पळून जाण्याची संधी देखील मिळणार नाही.

क्यूआरएसएम क्षेपणास्त्र कोणत्याही हवामान आणि कोणत्याही ठिकाणाहून सोडलं जाऊ शकतं. एकदा हे क्षेपणास्त्र डागलं गेलं की त्याला शत्रूकडून थांबवणं अशक्य आहे किंवा ते या क्षेपणास्त्राच्या संप्रेषण प्रणालीमध्ये व्यत्यय आणू शकत नाही. कारण या क्षेपणास्र मध्ये शत्रूच्या रडार ला चकमा देण्याची क्षमता आहे. याचाच अर्थ असा की जो पर्यंत हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रडारवर प्रदर्शित होईल त्याआधीच आपलं लक्ष वेधलेलं असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा