देहु-भंडारा डोंगर पीएमपी बससेवा सुरू! भाविकांना आता प्रवास होणार सुलभ

संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र देहू आणि तपोभूमी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे आता थेट बससेवेने जोडली गेली आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) ही नवीन बससेवा सुरू केली असून, भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

या बससेवेमुळे रोज श्रीक्षेत्र देहूत येणाऱ्या हजारो भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे. या मार्गावर दररोज सात फेऱ्या होणार असून, दोन पवित्र स्थळे आता सहजपणे जोडली गेल्याने वारकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील आणि रवींद्र भेगडे यांनी भाविकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ही सेवा धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धेला जोडणारा एक पूल ठरेल, असे काशीद पाटील यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे