नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी २०२३ :दिल्लीतील नांगलोई भागात मंगळवारी रात्री एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. साहिल मलिक असे पीडित तरुणाचे नाव असून, त्याच्यावर काही हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केला. याप्रकरणी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल मलिक नावाचा एक व्यक्ती जिममधून परतत असताना त्याची दुचाकी आरटीव्ही चालकाला लागली. यावरून विशाल मलिकचा आरटीव्ही चालकाशी वाद झाला. वादाच्या भरात अनेक मुले विशालशी भांडू लागली. त्यानंतर विशालने जखमी अवस्थेत नांगलोई पोलीस ठाणे गाठले.
विशाल मलिकने त्याचा भाऊ साहिल मलिकला फोन केला आणि तोही पोलीस स्टेशनला पोहोचला. कुटुंबीयांनी सांगितले की, पोलिसांनी साहिल मलिकला कोणतीही सुरक्षा न घेता दुचाकी घेण्यास पाठवले. साहिल तेथे पोहोचताच हल्लेखोरांनी साहिल मलिकवर धारदार चाकूने वार करून त्याची हत्या केली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.