MCD मधील पराभवानंतर दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा राजीनामा

नवी दिल्ली, ११ डिसेंबर २०२२ : दिल्ली महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. नड्डा यांनी गुप्ता यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आदेश गुप्ता यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजपची सत्ता उलथून लावली. भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या मतदार संघात उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. यात आदेश गुप्ता यांच्या मतदार संघातील उमेदवारांचाही पराभव झाला.

दिल्ली महापालिका निवडणुकीत २५o जागांपैकी आपने १३४ जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला १०४ जागा मिळाल्या आहेत. आदेश गुप्ता हे वार्ड नंबर १४१ (राजेंद्र नगर) येथे राहतात. येथून आम आदमी पक्षाच्या आरती चावला या निवडून आल्या आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा