गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट दिल्ली कॅपिटल पुन्हा एकदा पॉइंट्स टेबल मध्ये प्रथम स्थानी

दिल्ली कॅपिटल पुन्हा एकदा पॉइंट्स टेबल मध्ये प्रथम स्थानी

दुबई, १५ ऑक्टोबर २०२०: काल झालेल्या आयपीएल २०२० मधील ३० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने राजस्थान रॉयल्स संघाला १३ धावांनी पराभूत केले आहे. याच विजयसोबत दिल्ली कॅपिटल संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे.

सामन्यात दिल्ली कॅपिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात पृथ्वी शॉ पहिल्याच चेंडू वर क्लीन बोल्ड झाला. तसेच शिखर धवन याने ३३ चेंडूत ५७ धावांची अर्धशतकिय खेळी केली. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर याने सुद्धा ४३ चेंडूत ५३ धावा केल्या. ऑल राऊंडर मार्कस स्टोइनीस याने १८ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल संघाने २० षटक अखेर ७ बाद १६१ धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघाकडून गोलंदाजी करतांना जोफरा आर्चर याला ३ तर जयदेव उनांडकत याला २ आणि कार्तिक त्यागी याला १ विकेट मिळाला.

१६२ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून बेन स्टोक्स याने ३५ चेंडूत ४१ धावा ठोकल्या. तसेच रॉबिन उथप्पा याने ३२ तर संजू सॅमसन याने अवघ्या २५ धावा केल्या. कर्णधार स्टीव स्मिथ स्वस्तात माघारी परतला. दिल्ली कॅपिटल संघाकडून गोलंदाजी करतांना नॉरताजे याने २ तर तुषार देशपांडे याने २ आणि रविचंद्रन अश्विन याने १ विकेट घेतला. २० षटक अखेर राजस्थान रॉयल्स संघ ८ बाद १४८ धावा करू शकले. आणि दिल्ली कॅपिटल संघाने सामना १३ धावांनी आपल्या नावावर केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version