दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत दाखल, आज दुपारी घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई, २४ मे २०२३ -: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. ते आज दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर उद्या (२५ मे) ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजवर यांच्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित असणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार दिल्ली सरकारला दिला परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने अध्यादेश आणून बदलला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सरकारची कोंडी झाली आहे.

आता केंद्र सरकारने काढलेला हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी केजरीवाल यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून केजरीवाल उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी भेटीमध्ये चर्चा करणार आहेत. यावेळी पंजाबचे मुुख्यमंत्री भगवंत मान देखील त्यांच्यासोबत असतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा