गोल पोस्ट राष्ट्रीय वायएसआर काँग्रेसच्या खासदाराच्या मुलाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

वायएसआर काँग्रेसच्या खासदाराच्या मुलाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली, १८ जुलै २०२३: आंध्र प्रदेशातील वारएसआर काँग्रेसचे खासदार एम. श्रीनिवासुलू रेड्डी यांचे पुत्र राघव मंगुटा यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने आज मंजूर केला आहे. हवाला प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या मंगुटा यांना वैद्यकीय आधारावर जामीन देण्यात आला आहे.

ईडीचे अधिकारी जेव्हा दिल्ली किंवा चेन्नईतील कार्यालयात बोलवतील तेव्हा हजर राहावे, अशी अट घालत न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी मंगुटा यांना जामीन दिला आहे. जामिनावर असतानाच्या काळात चेन्नईमध्ये राहावे व दररोज सायंकाळी चार वाजता ईडी कार्यालयात हजेरी लावावी, असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहे.

दिल्लीतील अबकारी कर घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा तपास संस्थांच्या आरोप आहे. यासंदर्भात हवालाच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे. मंगुटा हा त्या हवाला प्रकरणात आरोपी आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version