दिल्ली हिंसाचारात बाहेरचे लोक,’एसआयटी’च्या अहवालात निष्कर्ष

26

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात, दिल्लीत करण्यात आलेल्या हिंसक आंदोलंनात बाहेरचे लोक असल्याचा निष्कर्ष विशेष तपास पथकाने काढला आहे. डिसेंबर महिन्यात दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जे आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये १०० जण जखमी झाले होते.

जामिया मिलिया इस्लामियामध्ये झालेल्या हिंसक आंदोलन व दगडफेकीत ओखला आणि बाटला हाऊसजवळील लोक सहभागी होते. त्याचाही अहवाल विशेष पथकाने सादर केला आहे.

सीलमपूर, मुस्तफाबाद आणि जाफराबादच्या तीन प्रकरणात गाझियाबादच्या लोनी व जुनी दिल्लीतील लोक सहभागी असल्याची माहिती तपास पथकाच्या अहवालातून समोर आली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा