दिल्लीकर अडकले वाहतूक कोंडीत

नवी दिल्ली : दिल्लीकरांना गुरुवारच्या सकाळी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कारण दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सध्या सुरू आहेत. त्यामुळे गुरुवारची सकाळ ही भीषण वाहतूक कोंडीने झाली. ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेले दिल्लीकर दोन तासात अक्षरशः एक किलोमीटरही पुढे सरकलेले नव्हते.

राजधानीतील विविध भागांमध्ये मोर्चे आणि निदर्शनं झाल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गुरुवारी शहरात दाखल होणारी वाहनं रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांवर बॅरिकेट्स लावण्याची वेळ आली होती.

पोलिसांच्या आदेशानुसार दिल्ली मेट्रोने आज सकाळी १४ मेट्रो स्थानकांची प्रवेशद्वारं बंद केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वर वाहतूक कोंडी झाल्यामुळे १६ विमानांची उड्डाणं विलंबाने होत आहेत. तर ‘इंडिगो’ विमान कंपनीने १९ फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. क्रू मेंबर्स शहरातील वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा