दिल्ली, १२ सप्टेंबर २०२२ : मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणामुळे जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. पण या दरम्यान जॅकलिनची या केस संदर्भातील नवी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांच्या EOW ने आर्थिक गुन्हेगारी विभागानं अभिनेत्रीच्या १२ सप्टेंबर,२०२२ रोजी होणाऱ्या चौकशीवर स्थगिती आणली आहे. या दरम्यान EOW जॅकलिनला आता आणखी एक समन्स जारी करणार आहे. दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला सुकेश चंद्रशेखर संबंधित २०० करोडच्या अफरातफरीच्या गुन्ह्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले होते.
या प्रकरणाविषयी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, जॅकलिनने दिल्ली पोलिसांना ईमेल द्वारे आदेश जारी होण्याआधीच काही कमिटमेंट्स केल्या होत्या. त्या कारणानं तिला १२ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या आदेशाप्रमाणे चौकशीला हजर राहता येणार नाही. जॅकलिनला खरंतर १२ सप्टेंबर रोजी EOW च्या कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश होते. पण आता ते तिला तिच्या काही कामांमुळे शक्य नसल्याने अजून तिला पोलिसांतर्फे एक समन्स जारी करण्यात येईल.
ईडीनं आपल्या चार्जशीटमध्ये जॅकलिनचे मनी लॉन्ड्रि्ग केस प्रकरणात नाव सामिल केले होते. ईडीनं आपल्या चार्जशीटमध्ये सांगितले होते की, जॅकलिनला सुकेशच्या गुन्ह्यासंदर्भात सविस्तर माहिती होती. पण तिनं हे सगळ लपवून ठेवलं. इतकंच नाही तर त्याच्याकडून महागड्या वस्तू, रक्कम भेट म्हणून स्वीकारली. मुंबई पोलिसांद्वारे दाखल केल्या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग केसच्या आधारे ईडीनं पुढील कार्यवाही करण्यास सुरुवात केली. लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आल्यानंतर ती याआधीही ईडी समोर चौकशीसाठी हजर राहिली होती. या प्रकरणात तिला ३० ऑगस्ट आणि २० ऑक्टोबर २०२१ रोजी चौकशीचे आदेश दिले होते. यापूर्वी अभिनेत्रीनं हे मान्य देखील केलं होतं की सुकेशने तिला महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामुळे आता जॅकलिनच्या संदर्भात काय कारवाई होते, हे पहाणं गरजेचं आहे.
न्यूज प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे