ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली, १२ जुलै २०२३ : महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी १५ जणांचा जबाब नोंदवल्यानंतर हे आरोपपत्र निश्चित करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तांत्रिक पुरावे म्हणून काही फोटोही ताब्यात घेतले आहेत. लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग आदीं गुन्ह्यांबाबत त्यांना शिक्षा ठोठावली जाऊ शकते, असे दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे भारतातील कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन केले होते. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचं कुस्तीपटूंनी ठरवलं. अखेर ब्रिजभूषण यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन स्थगित केलं. आता ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे. लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग आदी गुन्ह्यांबाबत त्यांना शिक्षा ठोठावली जाऊ शकते, असे दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

१३ जून रोजीच्या या आरोपपत्रात ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ५०६ गुन्हेगारी धमकी, ३५४ महिला विनयभंग, ३५४ अ लैंगिक छळ आणि ३५४ ड पाठलाग करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच एका प्रकरणात ब्रिजभूषण यांनी संबंधिताचा वारंवार छळ केल्याच तपासात आल आहे. सहापैकी दोन प्रकरणांत ब्रिजभूषण यांच्यावर ‘कलम ३५४, ३५४ अ आणि ३५४ ड’अंतर्गत तर चार प्रकरणांत ‘कलम ३५४’ आणि ‘३५४ अ’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमा नुसार पाच वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

वरील आरोपपत्रानुसार दिल्ली पोलिसांनी ब्रुजभूषण सिंह आणि साक्षीदारांना समन्स बजावण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. तसेच आरोपपत्रात मध्ये न्यायालयास उद्देशून नमूद केले आहे, की या प्रकरणी आरोपीवर खटला दाखल करण्यासाठी कृपया समन्स बजावावे. तसेच या आरोपपत्रात जोडलेल्या साक्षीदारांच्या यादीतील साक्षीदारांना त्यांचा नावाचा पुरावा असलेल्या कागदपत्रांसह त्यांच्या साक्षी- तपासणीसाठी न्यायालयासमोर बोलावले जावे. या आरोपपत्रात असेही नमूद केले आहे, की तपासकर्ते तपासादरम्यान १०८ साक्षीदारांशी बोलले आहेत. यापैकी १५ कुस्तिपटू, प्रशिक्षक आणि पंच आहेत. त्यांनी या सहा कुस्तिपटूंनी केलेल्या आरोपांची पुष्टी केली आहे.

भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना चार फोटो दिले आहेत. परदेश दौऱ्यात पीडित महिला कुस्तीपटूंसह ब्रिजभूषणही होते, हे दर्शवणारे ते फोटो आहेत. या पैकी दोन फोटोंमध्ये ब्रिजभूषण महिला कुस्तीपटूंबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहेत, असं आरोपपत्रात नमूद केले आहे. तसेच पोलिसांना मिळालेल्या फोटोंसह साक्षीदारांचे कॉल डिटेल्सही तपासण्यात आले आहेत. यानुसार, लैंगिक छळाच्या घटना ज्या ठिकाण झाल्या त्याठिकाणी ब्रिजभूषण सिंह उपस्थित होते, असंही या आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे. ब्रिजभूषण सिंह यांचे कार्यालय, कुस्ती महासंघाचे कार्यालय आणि ब्रिजभूषण सिंह यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने तेथील पुरावे पोलिसांना मिळू शकले नाहीत. या संदर्भात ब्रिजभूषण सिंह यांची अद्याप काही प्रतिक्रिया मिळालेली नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा