नवी दिल्ली, ११ जुलै २०२१: दिल्ली पोलिसांच्या हाती मोठं यश मिळालं आहे. दिल्ली पोलिसांनी २५०० कोटी किमतीची ३५० किलो हेरॉईन जप्त केली आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी चार आरोपींनाही अटक केलीय. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन जणांना हरियाणा आणि एका आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आलीय. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आजवर ड्रग्सची सर्वात मोठी तस्करी पकडली आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रग्सच्या सिंडिकेटचा हा खुलासा आहे. हेरॉईनची किंमत अडीच हजार कोटी असल्याचं म्हटलं जातेय. हे प्रकरण नार्को टेररिझमशी संबंधित असू शकते. नार्को टेररिझमच्या कोनातून तपास सुरू आहे. या सिंडिकेटचे धागेदोरे पाकिस्तानशीही जोडले जाण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे सीपी नीरज ठाकूर यांनी सांगितलं की, हे ऑपरेशन अनेक महिन्यांपासून सुरू आहे. एकूण ३५४ किलो हेरोइन जप्त करण्यात आली असून एका अफगाण नागरिकाला अटक केलीय. कंटेनरमध्ये लपवून हेरोइनचा माल समुद्रमार्गे मुंबईहून दिल्लीला आला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जवळील कारखान्यात हे ड्रग्स अधिक दर्जेदार बनविली जात होती. मग ड्रग्स-पंजाबला जायचे होते. फरीदाबादमध्ये ड्रग्स लपविण्यासाठी भाड्याचं घर घेतलं गेलं होतं आणि तिथं ते लपवून ठेवले होते. अफगाणिस्तानात बसलेले आरोपी हे लिंक चालवत होते.
पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं की, ड्रग प्रकरणात आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आलीय. फरीदाबादहून दोन जणांना अटक करण्यात आली असून काश्मीरमधील एका व्यक्तीला दिल्लीहून अटक करण्यात आलीय पाकिस्तानातून येणाऱ्या पैशाचा क्लूही सापडला आहे. पोलिसांनी सांगितलं की, काश्मीरमधील (अनंतनाग) एक व्यक्ती ड्रग्जसाठी रसायनांचा वापर करीत असे, ज्यावरून हेरोइनवर प्रक्रिया केली जात होती. पंजाबमधील दोन्ही आरोपींचे काम पंजाबमधून हे ड्रग्स पुरवण्याचं होतं.
मे महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांनी हेरॉईनचा मोठा माल जप्त केला होता. दोन अफगाण नागरिकांना सुमारे १२५ किलो हेरॉईनसह अटक केली. अटक केलेले दोन्ही आरोपी पती आणि पत्नी आहेत. पश्चिम जिल्ह्यातील पोलिसांकडून अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती सातत्यानं मिळत होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे